धुळे तालुक्यात सेनेचा झंझावात : एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगरात भाजपाला दिला धक्का ; गिरीश महाजनांना नुकसान नाही

धुळे : भाजपातून राष्ट्रवादीत गेलेल्या खडसेंमुळे खान्देशात आम्हाला काहीही फरक पडणार नाही, असे म्हणणाऱ्या भाजपाला खडसेंनी तिन्ही जिल्ह्यात जाेरदार धक्का दिला आहे. मुक्ताईनगरमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासाेबत अनेक ग्रामपंचायतीत भाजपाचा सुपडा साफ केला. मात्र काेथळी ग्रामपंचायतीत त्यांना निर्णायक यश मिळविता आले नाही. तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची टक्कर व खडसेंसारख्या बलाढ्य नेत्यांची कमतरता भाजापला ग्रामपंचायत निवडणुकीत प्रकर्षाने जाणवली. खान्देशातील तिन्ही जिल्ह्यात भाजपाचे पानीपत झाल्याचे निकालाावरून दिसून येत आहे.

धुळे : भाजपातून राष्ट्रवादीत गेलेल्या खडसेंमुळे खान्देशात आम्हाला काहीही फरक पडणार नाही, असे म्हणणाऱ्या भाजपाला खडसेंनी तिन्ही जिल्ह्यात जाेरदार धक्का दिला आहे. मुक्ताईनगरमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासाेबत अनेक ग्रामपंचायतीत भाजपाचा सुपडा साफ केला. मात्र काेथळी ग्रामपंचायतीत त्यांना निर्णायक यश मिळविता आले नाही. तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची टक्कर व खडसेंसारख्या बलाढ्य नेत्यांची कमतरता भाजापला ग्रामपंचायत निवडणुकीत प्रकर्षाने जाणवली. खान्देशातील तिन्ही जिल्ह्यात भाजपाचे पानीपत झाल्याचे निकालाावरून दिसून येत आहे.

जळगाव जिल्ह्य़ात जामनेर तालुका व एरंडोल तालुक्यातील काही भाग वगळता शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षांनी बाजी मारली. भाजपातून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंच्या नेतृत्वाला महाविकास आघाडीचे बळ मिळाले. परिणामी मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी व शिवसेनेचा झेंडा फडकला. भुसावळ तालुक्यावरही महाविकास आघाडीचे पडसाद उमटले.जळगाव ग्रामीणसह धरणगाव व एरंडोल तालुक्यातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला. जामनेर तालुक्यात मात्र आमदार गिरीश महाजन यांनी भाजपचे कमळ फुलविले. त्यांना महाविकास आघाडीचा फारसा फटका बसला नाही. पाचोऱ्यात शिवसेना व राष्ट्रवादीला समान ग्रामपंचायतीत सत्ता मिळविता आली.जळगाव जिल्ह्य़ात सर्वाधिक ६८७ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. त्यातील तब्बल ४०० ग्रामपंचायतींवर यापूर्वी भाजपाची सत्ता होती. यावेळी मात्र शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात यातील निम्म्या ग्रामपंचायतींची गेल्या आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यावर हुकुमी वर्चस्व मिळविले, असे चित्र दिसत आहे.

अमळनेर तालुक्यातील भाजपचे वर्चस्व कायम आहे. मुळात अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला अनिल भाईदास पाटलांमुळे पूर्व पट्ट्यातील ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविता आले. पण कॉंग्रेस पक्षाच्या तालुकास्तरावर काम करणाऱ्या सगळ्याच नेत्यांचे त्यांच्या स्वतःच्या गावातील पॅनलचे पॅनल कलंडले. यात किसान कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, तालुकाध्यक्ष गोकूळ बोरसे, राष्ट्रवादीच्या नेत्या तथा जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील यांनाही लोकांनी नाकारले.चाळीसगाव तालुक्यात भाजपा आमदार व खासदारांनी आपापल्या वर्चस्वाखालील ग्रामपंचायती भाजपाकडे राखल्या. पारोळा व भडगाव तालुक्यात शिवसेना व राष्ट्रवादीला समान स्थिती निर्माण झाली आहे.

धुळे तालुक्यात शिवसेनेचा झंझावात
धुळे तालुक्यात महाविकास आघाडीने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवित मुसंडी मारली. शिवसेनेचा झंझावात पहिल्यांदाच पहायला मिळाला. आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर गटाने कापडणे, सोनगीर यासारख्या मोठ्या ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली. तसेच शिरूड, विंचूर, सडगाव या गावांवरही सत्ता मिळवली. सुभाष देवरे यांच्या बोरीसमध्ये भाजपला जबर दणका बसला. देवरे विरोधातील पॅनल निवडून आले. मात्र पॅनल प्रमुख परशुराम पाटील यांचाच पराभव झाला. सुभाष देवरे यांची विलास व निखिल ही दोन्ही मुले निवडून आली..कापडणे येथे कृषी सभापती बापू खलाणे यांच्या पॅनलचा पराभव झाला.

शिरपूर तालुक्यात आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली ३५ गावांमध्ये भाजपचे कमळ फुलले आहे. शिंदखेडा तालुक्यात आमदार जयकुमार रावल यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. सवाई मुकटी या गावासारखा अपवाद वगळता बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपने सत्ता मिळवली आहे. साक्री तालुक्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व सिद्ध झाले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. मालपुर मध्ये मात्र खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे बंधू सुरेश पाटील यांचे पॅनल निवडून आले.