जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी रस्त्यावर

काेराेना संसर्गावर मात करण्यासाठी शासन स्तरावर माेठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. परंतु काही नागरिकांनी असूनही काेराेनाचे गांभीर्य ओळखलेले नाही. अशा नागरिकांमुळे इतरांना काेराेनाचा संसर्ग हाेताे आणि त्यांचा जीव धाेक्यात येताे. काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी अजूनही व्यापक जनजागृतीची गरज लक्षात घेऊन आज जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्तांनी आज थेट जनतेत जाऊन मास्क न घातलेल्या नागरिकांना मास्कचे वाटप करून मास्क कसे वापरावे, याचे प्रशिक्षण देऊन जनजागृतीचा प्रयत्न केला.

    धुळे : शहरात काेराेनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तरीहीदेखील नागरिकांकडून काेराेेना नियमांचे उल्लंघन हाेताना दिसते. दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असला तरी जनजागृतीही तितकीच महत्त्वाची आहे. या उद्देशाने जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त यांनी आज सायंकाळी फाशीपूल, बारा पत्थर, चाळीसगाव चौफुली, तिरंगा चौक आदी परिसरात पायी जात नागरिकांना मास्क लावण्यासाठी प्रवृत्त केले.