मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, १ जण ठार

धुळे : येथील मुंबई-आग्रा महामार्गावर नगावबारीजळ भीषण अपघात होऊन १ जण ठार तर ३ जण गंभीर झाले आहेत. पहाटे साडेतीन ते चारच्या सुमाराला हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय. कंटेनर आणि दुधाचा टँकर या दोन वाहनांत हा अपघात झाला.

धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नगावबारी परिसरात झालेल्या या अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. कंटेनरच्या डाव्या बाजूचे टायर फुटले होते. हे टायर बदलण्याचे काम सुरू असताना मागून आलेल्या दुधाच्या टॅंकरने जोरदार धडक दिली.

उभ्या असलेल्या टँकरमध्ये औषधं भरलेली होती. ही धडक इतकी जोरात होती की त्यामध्ये दुधाच्या टॅंकरने व उभ्या असलेल्या कंटेनरने   त्वरित पेट घेतला. या दुर्घटनेमध्ये टायर बदलण्यासाठी उतरलेली व्यक्ती चिरडली गेल्यामुळे जागीच मृत्यू झाला.

या अपघातात तीन जण भाजून गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.