रस्त्यावर चुली व गवऱ्या विकून केलं केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन

लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता अद्यापही आर्थिक संकटातून सावरलेली नाही. त्यातच पेट्रोल डिझेलच्या दरासह केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर दरात वाढ केल्यामुळे गृहिणींचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्यावतीने आज आक्रमक भूमिका घेण्यात येऊन रस्त्यावर चुली व गवऱ्या विकत अच्छे दिनाचा गाजर दाखवणाऱ्या केंद्र सरकारचा जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

    धुळे (Dhule).  लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता अद्यापही आर्थिक संकटातून सावरलेली नाही. त्यातच पेट्रोल डिझेलच्या दरासह केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर दरात वाढ केल्यामुळे गृहिणींचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्यावतीने आज आक्रमक भूमिका घेण्यात येऊन रस्त्यावर चुली व गवऱ्या विकत अच्छे दिनाचा गाजर दाखवणाऱ्या केंद्र सरकारचा जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

    गॅस सिलिंडर दरवाढ गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक असून, त्याच्याबरोबर पेट्रोल आणि डीझेलच्या दरातही सातत्याने दरवाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटंबांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. या दरवाढीचा त्रास गृहिणींनाच जास्त होत आहे. करोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते त्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असताना केंद्र सरकार मात्र दिलासा देण्याऐवजी जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरात वाढ करून त्यांची गळचेपी करत आहे. सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम केंद्र सरकार जाणीवपूर्वक करत आहे.

    अच्छे दिनाचे गाजर दाखवून सत्तेवर बसलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांची दिशाभूल करून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ करून सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे चांगले मोडले आहे. लॉकडाऊन मध्ये आर्थिक मंदी मंदावली असताना पेट्रोल व डिझेलच्या किमती बरोबरच त्यात घरगुती गँस दरवाढची फोडणी देऊन सर्व सामान्य गृहिणी व नागरिकांना मनस्ताप देण्याचा प्रकार केला आहे.
    त्यामुळे आज मोदी सरकारच्या निषेधार्थ धुळ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिलांनी आक्रमक भूमिका घेऊन शहरातील क्यूमाईन क्लब समोर रस्त्यावर चूल विकून आंदोलन केले.