पळासनेर गावात आढळली दुर्मिळ ‘लेपर्ड गेको पाल’; जाणून घ्या ‘या’ पालीची वैशिष्ट्ये

शिरपूर तालुक्यातील (Shirpur taluka) पळासनेर गावातील (Palasner village) जुने मार्केट यार्डमध्ये (old market yard) पश्चिम भारतीय लेपर्ड गेको (Leopard Gecko), जातीची दुर्मिळ पाल आढळून आली.

    धुळे (Dhule).  शिरपूर तालुक्यातील (Shirpur taluka) पळासनेर गावातील (Palasner village) जुने मार्केट यार्डमध्ये (old market yard) पश्चिम भारतीय लेपर्ड गेको (Leopard Gecko), जातीची दुर्मिळ पाल आढळून आली. ही पाल जखमी (injured) अवस्थेत आढळ्याने तिच्यावर उपचार करून वनविभागाच्या मदतीने जंगलात सोडण्यात आले.

    पळासनेर येथील जुने मार्केट यार्ड हद्दीत पश्चिम भारतीय मलेपर्ड गेकोफ ही दुर्मिळ पाल जखमी अवस्थेत आढळून आली. सातपुडा वन्यजीव संरक्षण समितीचे अध्यक्ष लकी जगदेव, प्राणीमित्र अरविंद जमादार, अंकित जैन, दीपक गिरासे, मयूर जाधव, निशिगंध पवार, प्रमोद शिरसाठ, प्रेम बिर्‍हाडे यांना ही पाल आढळून आली. ही पाल साधारणपणे पाच ते सात इंच लांब असते. बिबट्यासारखा रंग व पट्टे या पालीच्या अंगावर आहेत. म्हणून तिला लेपर्ड गेको असे नाव पडले आहे.

    इतर पाली सरपटत जातात. पण लेपर्ड गेको पाल ही पाल मगरी सारखी चालते, अशी माहिती प्राणीमित्र लकी जगदेव यांनी दिली. पळासनेर परिसरात पहिल्यांदाच ही पाल आढळून आली आहे. या पालीवर उपचार करून सांगवी वनविभागाचे रेंज फोरेस्ट ऑफिसर आनंद मेश्राम व वन कर्मचार्‍यांच्या सहकार्याने जंगलात सुखरूप सोडण्यात आले.