nardana midc todfod

नरडाणा : राष्ट्रवादी कॉंग्रेस (rashtrawadi congress)पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वंडर सिमेंंट कंपनीत तोडफोड केल्याची घटना आज घडली आहे. नरडाणा एमआयडीसीमधील वंडर सिमेंट कंपनीत(wonder cement company) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी स्थानिकांना रोजगार देत नसल्याने, व्यवस्थापक उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने कंपनीची तोडफोड करत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाने आंदोलन केले.

कंपनीत ८०% स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे, असे शासनाचे निर्देश असतानादेखील औद्योगिक वसाहतीमधील कारखाने स्थानिकांना रोजगार देत नाहीत. स्थानिकांना रोजगार मिळावा, या मागणीसाठी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नरडाणा एमआयडीसीमधील वंडर सिमेंट कंपनी येथे निवेदन देण्यासाठी गेले होते. व्यवस्थापकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. तसेच वंडर सिमेंट कंपनीच्या व्यवस्थापकांने कार्यकर्त्यांशी आणि कर्मचाऱ्यांशी अरेरावी केली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत तोडफोड केली. याबाबत उशिरापर्यंत नरडाणा पोलीस स्टेशन येथे घटनेची नोंद नव्हती.