महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेत देश सेवा बजवावी – जिल्हाधिकारी संजय यादव

  • महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज (रोहयो), श्रीकुमार चिंचकर (भूसंपादन), उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार सुचेता चव्हाण (संगायो), किशोर कदम (धुळे ग्रामीण), साहेबराव सोनवणे (शिंदखेडा), अपर तहसीलदार संजय शिंदे (धुळे शहर), सुदाम महाजन (दोंडाईचा) यांच्यासह महसूल विभागाचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

धुळे : देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या संकटातही न डगमगता महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी सेवा बजावत आहेत. या विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेत देशाची सेवा बजवावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आज येथे केले.  महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज (रोहयो), श्रीकुमार चिंचकर (भूसंपादन), उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार सुचेता चव्हाण (संगायो), किशोर कदम (धुळे ग्रामीण), साहेबराव सोनवणे (शिंदखेडा), अपर तहसीलदार संजय शिंदे (धुळे शहर), सुदाम महाजन (दोंडाईचा) यांच्यासह महसूल विभागाचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विभागीय महसूल दिन आणि महाराजस्व अभियानाच्या शुभारंभाचा कार्यक्रम नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, महसूल विभागाला प्रशासनाचा ‘कणा’ म्हटले जाते. ते अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कामातून पुन्हा एकदा सिध्द करून दाखविले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गातही महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी समर्पण भावनेने काम करीत आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वत:बरोबर कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. अपर जिल्हाधिकारी श्री. जगदाळे यांनी मार्गदर्शन करीत गुणवंतांचे कौतुक केले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गायकवाड यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन करून आभार मानले. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या गुणवंतांमध्ये उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज (रोहयो), तहसीलदार साहेबराव सोनवणे (शिंदखेडा), नायब तहसीलदार डी. एम. येवले (तहसील कार्यालय, धुळे), एस. एस. चौरे (तहसील कार्यालय, शिरपूर), लघुलेखक (उच्चश्रेणी) दिलीप कोकणी (जिल्हाधिकारी कार्यालय), अव्वल कारकून रंजनगीर युवराजगीर बावा (जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, धुळे), मंडळ अधिकारी व्ही. बी. पाटील (मुकटी, ता. धुळे), अनिल अशोक भामरे (वर्शी, ता. शिंदखेडा), लिपिक के. एन. सरकुंडे (अपर  तहसील कार्यालय, दोंडाईचा), अमोल सी. कोकणी (तहसील कार्यालय, साक्री), तलाठी एस. टी. शिंदे (शिरधाने प्र. नेर, ता. धुळे), श्रीमती आर. एन. राजपूत (वनावल, ता. शिरपूर), कोतवाल प्रवीण मोहिते (तहसील कार्यालय, साक्री), राजेंद्र विक्रम बोरसे (शिंदखेडा), शिपाई अनिल पाटील (गृहशाखा, जिल्हाधिकारी कार्यालय), श्रीमती जयश्री गोपाळ शिंदे (नगरपालिका शाखा),  वाहन चालक प्रशांत मोहन राजपूत (उपविभागीय अधिकारी कार्यालय, धुळे), सागर अशोक साळुंखे (जिल्हा पुरवठा कार्यालय), पोलिस पाटील प्रभाकर चिंतामण भदाणे (उंभर्टी, ता. साक्री) यांचा समावेश आहे.