सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे वृक्षारोपणाचा पंधरवडा साजरा

मामाचे मोहिदे : तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहू येथून व ज्ञानेश्वर माऊली पालखीचे आळंदी येथून प्रस्थान झाले. कोरोनाच्या सावटामुळे यंदा वारकरी भाविकांची पायी वारी नसल्यामुळे "

मामाचे मोहिदे : तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहू येथून व ज्ञानेश्वर माऊली पालखीचे आळंदी येथून प्रस्थान झाले. कोरोनाच्या सावटामुळे   यंदा वारकरी भाविकांची पायी वारी नसल्यामुळे ” भक्तीची त-हा न्यारी, वृक्षात दिसे हरी ! यंदा हरित वारी,करू आपल्या दारी !! ” हा सन्मित्र क्रीडा मंडळाचा संकल्प असून  आणि या उपक्रमानुसार दोन्ही संतांच्या  पालखी प्रस्थान व आषाढी वारीचे औचित्य साधून सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे शहादे शहरात व आदिवासी भागात विविध फळरोपे,वड, पिपंळ, बेल,निंब, आदि वृक्षांचे रोपवाटप करण्यात आले.महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी ,मोकळ्या मैदानात  वृक्षारोपण करण्यात येत आहे.आषाढी एकादशीच्या  दिवसा पर्यंत हा उपक्रम राबवण्यात येईल. रोपांची जोपासना व वाढविण्याची जबाबदारी ज्यांना रोपवाटप केले आहे,  त्यांनी आनंदाने स्वीकारली आहे.

 या उपक्रमासाठी सन्मित्र क्रीडा मंडळाचेअध्यक्ष प्रा ज्ञानी कुलकर्णी, एड.राजेश कुलकर्णी,  संपत कोठारी, ज्ञानेश्वर चौधरी, प्रा.आर टी पटेल, प्रतीमा माळी, प्रविणा कुलकर्णी, प्रतिभा बोरसे,कल्पेश पटेल,समीर जैन, रोहन माळी,प्रभू गुरव उपक्रमात सहभागी  होऊन परिश्रम घेत आहेत. रोपे वनश्री  हैदरभाई नुराणी यांनी सन्मित्र क्रीडा मंडळाला उपलब्ध करून दिली आहेत.