धक्कादायक प्रकार…धुळ्यात दगडाने ठेचून तरूणाचा खून

  • महाराष्ट्र , धुळे

 धुळे शहरातील एका तरूणाचा दगडाने ठेचून खून केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना धुळे शहरातील कालिका माता मंदिराजवळ घडली. तसेच ही घटना काल शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच येथील पोलिस उपअधीक्षक आणि पोलिस निरिक्षक घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच त्यांना या प्रकरणाची चौकशी करून मृतदेह ताब्यात घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीहा गरूड कॉम्पलेक्समधील एका कुरिअर सेंटरमध्ये कामाला होता. तसेच तो सायंकाळी उशीरा आलेले पार्सल घेऊन तो घराकडे निघाला होता. मात्र काही आरोपींनी त्या तुरूणाला दगडाने ठेचून त्याचा खून केला. पोलिस या गंभीर प्रकरणाचा तपास करीत आहेत.

या मृत व्यक्तीची ओळख पटली असून, त्याचं गेल्या वर्षीच लग्न झाल्याचं समजलं जात आहे. तसेच पोलिसांना गुन्हा दाखल केला असून, पोलिस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.