धक्कादायक घटना, घरातून बेपत्ता असलेल्या दोन वर्षाच्या चिमुकलीचा आढळला मृतदेह

घरातून अचानक बेपत्ता झालेल्या दोन वर्षाच्या (two year old girl) चिमुकलीचा मृतदेह विहिरीत पाण्यात तरंगतांना आढळल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. २ वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह विहिरीत कसा? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी धुळे (Dhule District) जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे.

धुळे : घरातून अचानक बेपत्ता झालेल्या दोन वर्षाच्या (two year old girl) चिमुकलीचा मृतदेह विहिरीत पाण्यात तरंगतांना आढळल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. २ वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह विहिरीत कसा? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी धुळे (Dhule District) जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे.

धुळे तालुक्यातील निमगुळ या गावांमध्ये प्राची प्रवीण महाजन ही दोन वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली. घरच्यांनी तिची शोधाशोध केली, मात्र आज सकाळी तिचा मृतदेह शिवारातील एका विहिरीत तरंगतांना आढळला. प्राची आणि तिचे कुटुंबीय घरात झोपले असतांना दार उघडून कोणीतरी तिला उचलून नेल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राचीचा मृत्यू घातपात आहे ? की नर बळी देण्याचा प्रयत्न आहे. याबाबत तपास होणे गरजेचे आहे. शवविच्छेदनात अधिक माहिती समोर येईल असे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.