
एका ज्येष्ठ नागरीकाच्या बंद घराचे तब्बल 35 हजार रुपये एवढे वीजबिल कंपनीने पाठविले आहे. शिवाय हे बील भरावेच लागेल अशी सक्तीच त्यांना करण्यात आली आहे. वीज कंपनीच्या अजब कारभाराविरोधात त्यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
धुळे : राज्य सरकारने रिडींग न घेताच थोपवलेली वीजबिले भरण्यास सांगितले आहे. ग्राहक वीज पुरवठा खंडीत होऊ नये म्हणुन वीजबिलाचा भरणा करत आहेत. मात्र वीज कंपनीच्या चुकीच्या बिलांचा भडीमार काही कमी होत नाही. असाच काहीसा प्रकार धुळे शहरापासून जवळच असलेल्या आर्वी येथे उघडकीस आला आहे.
येथील एका ज्येष्ठ नागरीकाच्या बंद घराचे तब्बल 35 हजार रुपये एवढे वीजबिल कंपनीने पाठविले आहे. शिवाय हे बील भरावेच लागेल अशी सक्तीच त्यांना करण्यात आली आहे. वीज कंपनीच्या अजब कारभाराविरोधात त्यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हा परिषदेतुन निवृत्त झालेले सुकलाल दगा शहरापासून जवळच असलेल्या आर्वी येथे त्यांनी मागील वर्षी घराचे बांधकाम केले. मात्र, बंद असलेल्या या घरात विजेचा वापरच नसल्यामुळे त्यांनी फेब्रुवारी महिन्यात वीज कर्मचाऱ्यांला सांगून वीज पुरवठा खंडीत केला. त्यानंतर जुलै महिन्यात परस्पर वीज पुरवठा सुरु करण्यात आला.
जुलै पासून डिसेबंरपर्यंत बंद असलेल्या घराचे वीज देयक 100 ते 300 रुपयांपर्यँत येत होते. हे वीज देयक धनराय अदा करत होते. मात्र मार्च 2020 पासून ते डिसेबंर 2020 पर्यंत धनराय यांच्या घराचा वीज वापर कमीत कमी 7 युनिट ते जास्तीत जास्त 20 युनिट दाखविण्यात आला आहे. ही सर्व बिल अंदाजेच देण्यात येत होती. यानंतर जानेवारी महिन्यात तब्बल एक हजार 883 युनिट वापर दाखवत थेट 26 हजार 430 रुपयांचे वीज बिल थोपविण्यात आले. शिवाय फेब्रुवारी महिन्यात चक्क 638 युनीट वीज वापर दाखवत 34 हजार 350 रुपयांचे वीज बील थोपवण्यात आले आहे.