भारतीय जनता पक्षातील अनेक आजी माजी आमदार आणि नेते हे काँग्रेस पक्षात प्रवेश येण्यास इच्छुक, नाना पटोलेंचा दावा

भारतीय जनता पक्षातील अनेक आजी माजी आमदार, नेते हे काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत. मध्यंतरी भाजपाने सीबीआय, ईडी सारख्या केंद्रीय यंत्रणामार्फत दबाव आणून भाजपात प्रवेश करण्यासाठी भाग पाडले ते भाजपात गेले असले तरी मनाने ते काँग्रेसचे आहेत त्यांच्या मनातून काँग्रेस जात नाही, असे अनेक जण काँग्रेस मध्ये येण्याच्या तयारीत आहेत असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

    धुळे : राज्यातील आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची भूमिका मांडत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राज्यभर दौरा करत आहेत. परंतु भाजपातील सुनील देशमुख यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आता नाना पटोलेंनी आणखी एक दावा केला आहे. राज्यातील भाजपातील अनेक नेते काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीत असल्याचं विधान नाना पटोलेंनी धुळ्यातील दौऱ्यात केले आहेत.

    भारतीय जनता पक्षातील अनेक आजी माजी आमदार, नेते हे काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत. मध्यंतरी भाजपाने सीबीआय, ईडी सारख्या केंद्रीय यंत्रणामार्फत दबाव आणून भाजपात प्रवेश करण्यासाठी भाग पाडले ते भाजपात गेले असले तरी मनाने ते काँग्रेसचे आहेत त्यांच्या मनातून काँग्रेस जात नाही, असे अनेक जण काँग्रेस मध्ये येण्याच्या तयारीत आहेत असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

    लोकसभेच्या निवडणुकीच्या काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा नारळ इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांनी याच धुळे, नंदुरबार जिल्ह्यातच फोडला जातो. काँग्रेस पक्ष हा आदिवासी, दलित, वंचित, सामान्य लोकांना न्याय देणारा पक्ष आहे. स्वातंत्र्याची जशी चळवळ उभी राहिली होती तशीच चळवळ पुन्हा उभी करून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे असं आवाहन नाना पटोले यांनी लोकांना केले. उत्तर महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकर्ते व शेतकरी यांच्याशी त्यांनी संवाद साधला.