आमंत्रण द्यायला माझ्या घरी लग्न नव्हते ; गाेटे महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच घसरले

धुळे : पाेलिसांत हजर राहण्यावरून भाजपा नेत्यांशी झालेल्या संघर्षानंतर अनिल गाेटे यांनी आता महािवकासच्या नेत्यांनाच खडसावले आहे. पाेलिसांत जाण्यासाठी माझ्या काही घरातले लग्न कार्य नव्हते की, मंगलप्रसंगी कुणाला कार्यक्रमास सहभागी होण्याचे निमंत्रण द्यावे.

धुळे : पाेलिसांत हजर राहण्यावरून भाजपा नेत्यांशी झालेल्या संघर्षानंतर अनिल गाेटे यांनी आता महाविकासच्या नेत्यांनाच खडसावले आहे. पाेलिसांत जाण्यासाठी माझ्या काही घरातले लग्न कार्य नव्हते की, मंगलप्रसंगी कुणाला कार्यक्रमास सहभागी होण्याचे निमंत्रण द्यावे. उद्या एखाद्या जवळच्या नातेवाईकाचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही निमंत्रणाची वाट पाहणार का? आपल्या जिल्ह्यात मतदारसंघात घडणाऱ्‍या राजकीय घटनांची माहिती नसेल तर तुम्ही राजकारणात राहण्यासाठी नुसते अपात्र नाहीत तर लायक नाहीत,अशी बाेचरी अनिल गोटेंनी केली आहे.

नेते भूमिगत झाले हाेते?
जयकुमार रावल यांच्या दहशतीबद्दल आणि खोटे गुन्हे दाखल करण्याबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी करणा-यांवर प्रत्यक्ष मैदानात उतरून समोरासमोर संघर्ष करण्याची वेळ आली. त्या वेळेला महाराष्ट्र विकास आघाडीचे कथीत मिरवणारे नेते कुठे भूिमगत झाले होते? हा खरोखर संशोधनाचा विषय आहे. महाराष्ट्र विकास आघाडीतील घटक पक्षांचे राज्य पातळीवरील वरिष्ठ नेते व आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांची ज्या ज्या वेळेस मुबंईला भेट होते तेव्हा प्रत्येक वेळी घटक पक्षाचे नेते रावलाच्या गुडंगिरीबद्दल माझ्याशी गांभीर्याने चर्चा करतात. एवढेच नव्हे तर, गोटेसाहेब आमच्या अमक्या तमक्या नेत्याला, कार्यकर्त्याला तुम्ही मदत करा, असा विषय भेट होताच चर्चेत घेतात. बिचा-या वरिष्ठ नेत्यांना काय माहिती की, पक्ष कुठलाही असला तरी आपले कार्यकर्ते तेथे रावलच्या मलीद्यावरच पोसले जात आहेत, असेही गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे.

आता थांबणार नाही
वयाच्या ७३ व्या वर्षी माझ्या मनात चिड निर्माण झाली, मी निर्णय केला की, इतरांना तुरुंगात ठेवताना रावलांना जो आसुरी आनंद झाला. तेव्हा काेेणी काय केले, याच्याशी मला काही घेणंदेणं नाही. पण रावलांच्या या सैतानी कृत्याला कायमची मूठमाती दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. माझ्या निर्णयापासून मी तसुभर पुनर्विचार करणार नाही. जे माझ्या बरोबर येतील त्यांच्यासह, जे माझ्याबरोबर येणार नाहीत त्यांना आडवे घालून, प्रसंगी पायी तुडवून पुढे जाईल; पण जयकुमार रावलांना धडा शिकविण्यापासून मला काेणीही थांबवू शकत नाही. याच रावलांनी धुळे शहरातील त्यांच्या आश्रीतांना बरोबर घेऊन शहराचा सत्यानाश करण्यास कारणीभूत ठरले आहेत, असा आराेेपही त्यांनी पत्रकात केला आहे.