ट्रकची बाईकस्वाराला धडक; नागरीकांनी ट्रक चालकाला बदडून काढले

दोंडाईचा नंदुरबार चौफुली येथे भीषण अपघात झाला आहे.  ट्रकने मागुन मोटरसायकला दिलेल्या जोरदार धडकेत मोटरसायकल चालक जागीच ठार झाला असुन त्याची पत्नी गंभीर जखमी झल्याची घटना घडली आहे.

    दोंडाईचा : दोंडाईचा नंदुरबार चौफुली येथे भीषण अपघात झाला आहे.  ट्रकने मागुन मोटरसायकला दिलेल्या जोरदार धडकेत मोटरसायकल चालक जागीच ठार झाला असुन त्याची पत्नी गंभीर जखमी झल्याची घटना घडली आहे.

    सायरा जफर बागवान( वय३०) असे जखमी महिलेचे नाव आहे. तर, या महिलेचा पती जफर गुलाब बागवान(वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दोघे पती पत्नी दुकाचाकीने चालले असता त्यांच्या बाईकला ट्रकने जोरदार धडक दिली. यात  मोटरसायकल चालक जफर बागवान जागीच चेंदामेंदा होऊन ठार झाला. तर त्यांची पत्नी सायरा बागवान गंभीर जखमी झाली आहे.

    सायरा बागवान यांच्यावर  धुळे जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. यावेळी घटनास्थळावरून ट्रक चालक पळून जात असताना, नागरीकांनी चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. मात्र लगेच दोंडाईचा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष लोले,पोलीस उपनिरीक्षक सचीन गायकवाड हजर झाल्याने ट्रक चालकाचे प्राण वाचले व पोलिस ठाण्यात ताब्यात घेण्यात आले. तसेच रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.