कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि लॉकडाऊनमुळे धुळ्यातील तरूणांवर बेरोजगारीची वेळ ?

कोरोनाचे संकट सगळीकडे पसरत चालले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु येथील नागरिकांचा बेरोजगारीचा प्रश्न वाढला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यातील जवळपास १ लाख ४०७ तरूणांनी विकास रोजगार केंद्रात नाव नोंदणी केली आहे.

परंतु शैक्षणिक पात्रता झाल्यावर नोकरी आणि रोजगाराच्य संधी उपलब्ध नसल्यामुळे येथील नागरिकांना बेरोजगाराला सामोरे जावे लागत आहे. मुंबई, पुणे आणि अन्य जिल्ह्यानंतर विविध उद्योग ठप्प झाले आहेत. त्यामुळे परजिल्ह्यात गेलेल्या तरूणांना जिल्ह्यात परतावे लागत आहे.

मात्र अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात काही जणांच्या नोकऱ्या हातून गेल्यामुळे, अनेकांना बेरोजगार व्हावे लागले आहे. त्यामुळे काही नागरिकांनी आणि तरूणांनी रोजगार सुरू व्हावा, यासाठी स्वयंरोजगार कार्यालयाकडे नोंदणी केल्याची समजलं जात आहे.