बारीपाड्यासारख्या गावांमुळेच भारत बनेल आत्मनिर्भर : राज्यपाल

बारीपाडा येथे जल, जंगल, जमिनीचे संवर्धन करण्यात आले आहे. अशा उपक्रमांमुळेच ग्रामीण भारतातील गावे आत्मनिर्भर बनून देश आत्मनिर्भर होण्यास मदत होईल, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलाराज्यपाल कोश्यारी आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांचे आज सकाळी साक्री तालुक्यातील बारीपाडा या स्वयंनिर्भर गावात आगमन झाले. यानिमित्त बारीपाडा येथील पर्यावरण अभ्यास केंद्रात सामूहिक वनहक्क अधिकार पत्राचे वितरण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

    धुळे : बारीपाडा येथे जल, जंगल, जमिनीचे संवर्धन करण्यात आले आहे. अशा उपक्रमांमुळेच ग्रामीण भारतातील गावे आत्मनिर्भर बनून देश आत्मनिर्भर होण्यास मदत होईल, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलाराज्यपाल कोश्यारी आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांचे आज सकाळी साक्री तालुक्यातील बारीपाडा या स्वयंनिर्भर गावात आगमन झाले. यानिमित्त बारीपाडा येथील पर्यावरण अभ्यास केंद्रात सामूहिक वनहक्क अधिकार पत्राचे वितरण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

    यावेळी व्यासपीठावर सरपंच सुनीता बागूल, बारीपाडा गावाचे शिल्पकार चैत्राम पवार, मोतीराम पवार, विजय पवार उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले, जंगल हे जीवसृष्टीसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्याचे रक्षण करणे आपल्या हातात आहे. मानवाने जंगलाचे रक्षण केल्यास त्याचा लाभ जीवनात नक्कीच होतो. बारीपाडा येथे चैत्राम पवार यांनी उभे केलेले काम आनंददायी आणि प्रेरणादायी आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांनी उभारलेले काम कौतुकास्पद आहे. जमीन, जंगल आणि जल या त्रिसूत्रीवर येथे काम होत आहे. ज्या गावात जमीन आहे, तेथे जंगल उभे राहते, अशा ठिकाणी कधीही पाऊस कमी पडत नाही. बारीपाडा येथे चैत्राम पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वांना सोबत घेवून गावाचा विकास केला आहे. बारीपाडासारख्या आदिवासी गावात आदिवासी विकास, कृषी, महसूल आणि वन विभागाच्या सहकार्याने गावकऱ्यांनी घडविलेला बदल अनुकरणीय आहे. गाव विकासाचा हा रथ पुढे नेवून अन्य गावांनाही या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते सामूहिक वन दावे सनदचे वितरण करण्यात आले. त्यात शेंदवडचे सरपंच वसंत गायकवाड, वाकीचे सरपंच जालमसिंग देसाई, वर्दळी येथील सरपंच काळू अहिरे, प्रतापपूरचे सरपंच ऋतूराज ठाकरे, चरणमाळचे सरपंच ओंकार राऊत, उंभरेचे सरपंच अनंत अकलाडे आणि नांदर्खीच्या सरपंच सुनीता गावित यांनी सनद स्वीकारली. त्यांच्या आगमनानिमित्त आदिवासी बांधवांनी गेर, शिबली आदी नृत्य सादर केली. हे नृत्य राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी नृत्यास भरभरुन दाद दिली. तसेच त्यांनी नृत्य करणाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, आमदार मंजुळाताई गावित, राजभवनचे प्रधान सचिव संतोषकुमार, उपसचिव श्वेता सिंघल, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, धुळे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक दिगंबर पगार, उपवनसंरक्षक माणिक भोसले, उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, पिंपळनेरचे अपर तहसीलदार प्रवीण थवील, डॉ. आनंद फाटक यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    बारीपाडा येथील संवर्धित वनास भेट
    राज्यपालांनी बारीपाडा येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीने संवर्धित केलेल्या वनाची पाहणी केली. वनसंरक्षक पगार यांनी संयुक्त वनव्यवस्थापन समितीने विकसित केलेल्या वनाची प्रतिमा, तर लळिंग कुरणातील धबधब्याची प्रतिमा उपवनसंरक्षक भोसले यांनी भेट देवून स्वागत केले. वन समितीच्या सदस्यांनी राज्यपालांचे स्थानिक आदिवासी बोली भाषेत गीत सादर करुन स्वागत केले. वन समितीचे अध्यक्ष चैत्राम पवार यांनी वनराई बंधारा, अन्य कामाची माहिती दिली. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे संवर्धित केलेल्या वनाचे काम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे, असे राज्यपाल म्हणाले.
    यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रंधे, आमदार श्रीमती गावित, जिल्हाधिकारी यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., सहायक वनसंरक्षक संजय पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. माळके यांच्यासह ग्रामस्थ, वन समितीचे सदस्य उपस्थित होते.

    लोकप्रतिनिधींशी साधला संवाद
    पर्यावरण अभ्यास केंद्रातील सभागृहात राज्यपालांनी लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, आमदार मंजुळाताई गावित, माजी खासदार बापू चौरे, डी. एस. अहिरे, साक्री पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी राज्यपाल कोश्यारी यांचा बैलगाडीची प्रतिकृती देवून सत्कार केला. राज्यपाल कोश्यारी यांनी लोकप्रतिनिधींकडून विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती जाणून घेतली. तसेच यावेळी राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत शबरी विकास महामंडळ आणि देशबंधू फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांच्यात सामंजस्य करार झाला.