प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

घराबाहेर निघताच विजेची तार तुटून अंगावर पडल्याने शॉक लागून 48 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. विजेच्या पोलवरील तार वारंवार हलत होत्या. यामुळे लहान मोठे शॉर्टसर्कीट देखील होत होत्या. याबाबत रात्रीच वीजवितरण विभागाला तक्रार देण्यात आली होती.

    धुळे (Dhule).  घराबाहेर निघताच विजेची तार तुटून अंगावर पडल्याने शॉक लागून 48 वर्षीय महिलेचा मृत्यू (woman died of shock) झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. विजेच्या पोलवरील तार (The wires on the electricity pole) वारंवार हलत होत्या. यामुळे लहान मोठे शॉर्टसर्कीट (big short circuits) देखील होत होत्या. याबाबत रात्रीच वीजवितरण विभागाला (the power distribution department) तक्रार देण्यात आली होती. मात्र याकडे महावितरण विभागाच्या कुठल्याही संबधित अधिकाऱ्याने लक्ष न देता वीज देखील खंडित केली नाही. आज सकाळी त्याच पोलवरील तार तुटल्याने महिलेचा मृत्यू झाला.

    धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील जय शंकर कॉलनीत आज सकाळी घंटागाडीत कचरा टाकण्यासाठी घराच्या बाहेर आलेल्या आशाबाई राजेंद्र येवले वय 48 या महिलेच्या अंगावर अचानक वीजेची तार तुटल्यामुळे जोरदार शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला. रात्रीच वीजवितरण विभागाला या तारांविषयी तक्रार करण्यात आली असता वीज वितरणाच्या दुर्लक्षामुळे आशाबाई येवले यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत परिसरातील रहिवाशांनी आणि नातेवाईकांनी रोष व्यक्त केला आहे.