दिनविशेष दि. ०३ डिसेंबर; भोपाळ वायू दुर्घटनेला आज ३६ वर्ष पूर्ण

जागतिक अपंग दिन

१७९६: दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.

१८१८: इलिनॉय अमेरिकेचे २१ वे रान्य बनले.

१८२९: लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.

१८७०: बॉम्बे म्युच्युअल लाईफ अ‍ॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.

१९२७: लॉरेल आणि हार्डी यांचा पहिला चित्रपट पुटिंग पॅट ऑन फिलिप्स प्रकाशित झाला.

१९६७: डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.

१९७१: पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.

१९७९: आयातुल्लाह खोमेनी ईराणचे सर्वेसर्वा बनले.

१९८४: भोपाळ वायू दुर्घटना – भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.

१९९४: जपानमध्ये प्लेस्टेशन रिलीझ करण्यात आले.