dinvishesh

आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन

घटना:

१८३१: मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction) गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.

१८८८: थॉमस एडिसन यांनी ऑप्टिकल फोनोग्राफ (प्रथम चित्रपट) साठी पेटंट दाखल केले.

१९१७: पहिले महायुद्ध – इंग्लंडने जर्मनीवर पहिला बॉम्बहल्ला केला.

१९३१: माफिया डॉन अल कपोन यांना आयकर बुडवल्याबद्दल शिक्षा झाली.

१९३३: अल्बर्ट आइनस्टाइ हे नाझी जर्मनीतुन पळून अमेरिकेत आले.

१९३४: प्रभात चा अमृतमंथन हा चित्रपट पुण्याच्या प्रभात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

१९४३: बर्मा रेल्वे – रंगून ते बँकॉक हा रेल्वेमार्ग पूर्ण झाला.

१९५६: पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र अधिकृतपणे ईंग्लंडमध्ये सुरु झाले.

१९६६: बोटस्वाना आणि लेसोथो यांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९७९: मदर तेरेसा यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला.

१९९४: पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (NIV) विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ. टी. जेकब जॉन यांना डॉ. शारदादेवी पॉल पारितोषिक जाहीर.

जन्म :

१८१७: भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १८९८)

१८६९: भारत गायन समाज या संस्थेचे संस्थापक गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९२२)

१८९२: कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव सोपानराव बोरावके यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९६८)

१९१७: वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोर यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९९४)

१९३०: अटकिन्स आहार चे निर्माते रॉबर्ट अटकिन्स  यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल २००३)

१९४७: चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका सिम्मी गरेवाल यांचा जन्म.

१९५५: अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९८६ – मुंबई)

मृत्यू:

१८८७: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्ताव्ह किरचॉफ यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १८२४)

१९०६: जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ यांनी जलसमाधी घेतली. (जन्म: २२ ऑक्टोबर १८७३)

१९८१: भारतीय लेखक, कवी आणि गीतकार कन्नादासन यांचे निधन. (जन्म: २४ जून १९२७)

१९९३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचे निधन. (जन्म: १२ मे १९०७ – पालिताणा, गुजराथ)