२१ सप्टेंबर : १९४२ साली दुसऱ्या महायुद्धात युक्रेनमधे नाझींनी २८०० ज्यू लोकांची हत्या केली.

    घटना.

    १७९२ : अठराव्या लुईचं साम्राज्य बरखास्त केलं आणि फ्रेंच प्रजासत्ताकाचा जन्म झाला.

    १९३४ : प्रभातच्या दामलेंनी सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन प्रभात चित्रमंदिर या नावाने सुरू केले.

    १९४२ : दुसरे महायुद्ध – युक्रेनमधे नाझींनी २८०० ज्यू लोकांची हत्या केली.

    १९६४ : माल्टा हा देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.

    १९६५ : गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

    १९६८ : रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली.

    १९७१ : बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

    १९७६ : सेशेल्स देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

    १९८१ : बेलिझे देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.

    १९८४ : ब्रुनेई देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

    १९९१ : आर्मेनिया हा देश सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाला.