३ ऑक्टोबर : १९५२ साली युनायटेड किंग्डमने यशस्वीरीत्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनण्याचा मान पटकावला.

  घटना.

  १६७० : शिवाजी महाराजांनी दुसर्‍यांदा सुरत लुटली.

  १७७८ : ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचले.

  १९३२ : इराकला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  १९३५ : जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.

  १९५२ : युनायटेड किंग्डमने यशस्वीरीत्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले.

  १९९० : पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.

  १९९५ : ओ.जे. सिम्पसनची आपल्या भूतपूर्व पत्‍नी निकोल सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनच्या खूनाच्या आरोपातून सुटका.