इतिहासात आजचा दिवस; सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती झाल्या होत्या बंद

  १८३१: विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी बसले.

  १८५७: ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना सातार्‍यातील गेंडा माळावर फाशी

  १९००: अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन येथे आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.

  १९४४: दुसरे महायुद्ध – लंडनवर पहिल्यांदा व्ही.२ बॉम्बचा हल्ला.

  १९५४: साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना.

  १९६२: स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने नवीन संविधान अंगीकारले.

  १९६६: स्टार ट्रेक या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले.

  १९९१: मॅसेडोनिया युगोस्लाव्हिया पासून स्वतंत्र झाला.

  २०००: सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात.

  २००१: लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड.