dadabhai nauroji

आज दादाभाई नौरोजींच्या जयंतीच्या (Dadabhai Naoroji Birth Anniversary)निमित्ताने त्यांच्या जीवनाविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

  भारत (India)देशाला स्वातंत्र्य(Freedom) मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी योगदान दिले. मात्र भारतीयांना स्वातंत्र्य मिळावे म्हणून दादाभाई नौरोजींनी(Dadabhai Naoroji) महत्त्वाचे काम केले. महात्मा गांधींच्या आधी ते भारतातील एक मोठे नेते होते. जातीवाद आणि साम्राज्यवाद याला त्यांचा विरोध होता. आज दादाभाई नौरोजींच्या जयंतीच्या (Dadabhai Naoroji Birth Anniversary)निमित्ताने त्यांच्या जीवनाविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

  दादाभाई नौरोजी यांचा जन्म मुंबईत ४ सप्टेंबर, १८२५ रोजी झाला.‘नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’  संस्थेच्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले. या कॉलेजात प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेले पहिले भारतीय होते, असे म्हटले जाते.

  संस्थांची स्थापना
  ‘ज्ञानप्रप्रसार सभा’ या संस्थेच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. याच संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मुंबईतील पहिली कन्याशाळा सुरू केली. ‘रास्त गोफ्तार’ या साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी समाजजागृतीचे कार्य केले. तसेच ‘बॉम्बे असोसिएशन’ संस्थेच्या स्थापनेतही त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

  इंग्लडला प्रयाण
  पुढे १८५५ मध्ये ते एका कंपनीच्या कामाच्या निमित्ताने ते इंग्लंडला गेले.तिथे त्यांनी ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली. भारतात परत आल्यानंतर १८७५ मध्ये ते मुंबई महानगरपालिकेचे सदस्य झाले.

  राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महत्त्वाचा वाटा
  दरम्यान १८८५ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी काम केले. काँग्रेसच्या स्थापनेतही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. ब्रिटिश संसदेचे पहिले भारतीय (हिन्दी) सदस्य बनण्याचा मान त्यांनी मिळवला होता. तसेच रॉयल कमिशनचे पहिले हिन्दी सदस्य होण्याचा मानही त्यांनाच प्राप्त झाला होता.वयाच्या ९२ व्या वर्षी ३० जून १९१७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.