राशी भविष्य ५ मे २०२१: ‘कर्क’ राशीच्या लोकांना आवडत असलेल्या गोष्टींसाठी वेळ काढावा लागेल

  मेष :

  साथीदाराच्या एखाद्या कृतीने धक्का बसला तर, ते फक्त तुमच्या आनंदासाठी असं करत आहेत हे विसरु नका. अनेक कामांसाठी तुमच्या परवानगीची विचारणा होईल.

  वृषभ :

  सध्या तुम्ही निराश आहात. पण, सर्वतोपरी प्रेमाच्याच बळावर सारंकाही सुरु आहे असं नाही. सर्वप्रथम स्वत:ला प्राधान्य द्या. दुसऱ्यांचा विचार करणे सोडावे.

  मिथुन :

  स्वत:वर प्रेम करायला शिका. स्वत:ला समजून घ्या. कोणी एक व्यक्ती आज, तुमच्यावर प्रेम व्यक्त करेल. त्या व्यक्तीमध्ये तुम्हालाही रुची असेल तर पुढचं पाऊल टाका. व्यायाम करावा.

  कर्क :

  नकारात्मक शक्ती तुमच्या वाटेतील अडथळा होईल. पण, हा टप्पाही तुम्ही पार कराल. स्वत:ची काळजी घ्या. आराम करा. ज्या गोष्टींची आवड आहे, त्यासाठी वेळ काढा.

  सिंह :

  सामाजिक कार्यक्रमांमध्ये बराच वेळ व्यतीत कराल. साथीदाराचाही तुम्हाला विसर पडेल. पण, तरीही साथीदाराकडून तुम्हाला खास वागणूक मिळेल. ते तुमची फार काळजी घेतील.

  कन्या :

  तुम्ही कायमच सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केला, पण आता मात्र धोका पत्करण्याची गरज आहे. विशेषत: प्रेमसंबंधांमध्ये. नव्या गोष्टींचा सामना करा. आत्मविश्वास वाढीस लागेल.

  तुळ :

  कामाच्या मर्यादा निर्धारित करा. अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी काही असे अनुभव मिळतील, जे तुम्हाला फायद्याचे ठरतील.
  आरोग्याची काळजी घावी.

  वृश्चिक :

  अडचणींशी दोन हात करा. मनाच्या जवळची व्यक्ती तुम्हाला भेट देईल. कोणावरही खुल्या मनाने प्रेम व्यक्त करा. अडचणींवर तोडगा निघेल. वाचनाकडे लक्ष द्यावे.

  धनु :

  एका चांगल्या अनुभवासाठी तयार राहा. नोकरदार वर्गाला याचा फायदा होणार आहे. एखादी अशी निवड करा जी तुम्हाला आनंद देणारी ठरेल. शासकीय नियमांचे पालन करावे.

  मकर :

  दीर्घ काळासाठी एकटे राहू नका. हे काळजीत टाकणारं असेल. जे काही करण्याची इच्छा असेल, त्याचा फायदा घ्या. तुम्ही कायमच बंधनात राहिल्यामुळे आता स्वत:वर प्रेम करणं शिका.

  कुंभ :

  आज तुम्ही स्वत:च्याच उत्साही बाजूचा अनुभव घ्याल. सारा वेळ तुम्ही घरात राहणार नाही. अनेक कामं हाताशी घ्याल. एखादं शुभकाम घडेल. जुनी एकच पूर्ण होईल.

  मीन :

  ज्या व्यक्तिविषयी तुम्ही अमुक एक अपेक्षा करत असाल. त्याविषयीच्या इच्छा पूर्ण होतील. प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाका. प्रयत्न करत राहा. यश नक्की मिळेल.