असे तुला काळजी भक्तांची

शेगावला, माझ्या ऐकिवात असल्याप्रमाणे जवळजवळ विविध ४२ प्रकारचे सेवाकार्य येथे राबविण्यात येतात. तिथला कार्यरत असणारा सेवक वर्ग हा भक्तांची सेवा हाच आपला जीवनधर्म मानूनच आपले कार्य अगदी निर्मळ मनाने पार पाडतो.

  बरेच वर्ष झाले म्हणजे मला कळल्यापासून मी गजानन महाराजांची भक्त आहे आणि नित्य रुपाने जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा मी शेगावला दर्शनाला जाते. आज महाराजांचा प्रगट दिन त्यानिमित्ताने शेगाव येथील काही अनुभव मला लिहावेसे  वाटतात.

  शेगावला, माझ्या ऐकिवात असल्याप्रमाणे जवळजवळ विविध ४२ प्रकारचे सेवाकार्य येथे राबविण्यात येतात. तिथला कार्यरत असणारा सेवक वर्ग हा भक्तांची सेवा हाच आपला जीवनधर्म मानूनच आपले कार्य अगदी निर्मळ मनाने पार पाडतो. कार्यरत असलेले हजारो हात हे सेवावृत्तीने आढळून येतात.  कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता कार्यकारी हजारो सेवक कार्य करताना दिसतात.  जणू काही त्यांच्यात महाराजांचा अदृश्य रूपात आपल्याला दर्शन होतं आहे असं मनोमन वाटतं. आश्चर्य म्हणजे, यात महिलांचा समावेश असतो. सर्व विभागातील लहान-मोठी सर्व कामे हा सेवेकरी वर्ग पार पाडत असतो. एक गोष्ट अशी की तिथला प्रत्येक कार्यकारी हा प्रत्येक भक्ताला माऊली अशी हाक मारतो. ती हाक एकली की आपली जवळची व्यक्ती आपल्याला हाक मारते का असा भास होतो.

  मला एक वेगळा अनुभव हा आला मी एका पायाने अधू आहे, मी जात असताना तिथल्या एका कार्यकारी व्यक्तीला मी लंगडतांना दिसली,  त्याने लगेच मला गर्दीतून नेऊन वेगळ्या मार्गाने महाराजांचे लवकर दर्शन घडवून दिले. ह्यात अस दिसून येत की,  त्यांची नजर प्रत्येक भक्ताकडे दिसते.  खरंच मी त्या वेळी खूप गदगद झाली. माझा दादा आहे विश्वास जोशी  त्याच्यासोबत मी बरेच वेळा महाराजांचे दर्शन घ्यायला गेली. तो पण एक महाराजांचा  भक्त आहे.

  दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे मंदिर परिसरात आढळणारी स्वच्छता. तिथल्या  स्वच्छतेचे सर्व श्रेय तिथल्या सेवेकऱ्यांना जात.

  मोबदला मिळतो म्हणून सेवा करावी अशी भावना आज आपल्याला दिसते.  पण ती भावना तिथे कोणातच आढळून येत नाह.  तिथे सेवा करणाऱ्या प्रत्येक सेवेकराचे वर्णन संताच्या वाणीत,

  “भूक असे भाकरीची 

      मात्र छाया ती झोपडीची

      निवाऱ्यास त्यांना द्यावी

     ऊब थोडी  गोधडीची,

    माया, मोह, लोभ  सारे 

    बाजूला सरती, मागणे काही नसे 

    त्यांचे मागणे फक्त एका प्रेमासाठी”

  २४ तास कार्य कार्यरत असणाऱ्या विभागात भक्ता मार्फत स्वेच्छेने दिली जाणारी देणगी घेतली जाते.  देणगीदारांनी संस्थातर्फे देणगीचाच एक दशांश भाग प्रसाद रुपाने परत दिला जातो. ह्या प्रसादात लाडू, शाल, उपरणे किंवा ब्लाउज पीस, कपडे यांचा समावेश असतो. दान पेटी मध्ये भक्ताकडून प्राप्त झालेल्या सोने, चांदी वस्तूच्या पादुका तयार करून भक्तांना प्रसाद रूपाने दिल्या जातात.  मुख्य म्हणजे देणगी स्वरुपात आलेल्या वस्तूंची व कोणत्याही वस्तूंची विक्री किंवा लिलाव होत नाही हे विशेष.

  असा महिमा आपल्याला कुठेच नाही दिसत तो दिसतो फक्त शेगाव येथेच. प्रत्येक भक्ताने प्रत्येक महिन्या एकदा तरी शेगावला दर्शनास जावे.

  शीर्वाद असावा हेचि आता देवा घडू द्यावा सत्संग   घडावी नित्यसेवा

  पल्लवी उधोजी

  नागपूर