१० जून दिनविशेष ; माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादा पराभूत झाला. ; जाणून घ्या आजच्या दिवसाची वैशिष्ट्ये !

    घटना.

    १७६८ : माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादा पराभूत झाला.

    १९२४ : इटलीच्या समाजवादी नेता ज्याकोमो मॅट्टेओटी यांची हत्या.

    १९३५ : अ‍ॅक्रन, ओहायो येथे बॉब स्मिथ बिल विल्सन यांनी अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस या संस्थेची स्थापना केली.

    १९४० : दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

    १९४० : दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले.

    १९४४ : ओरादू-सुर-ग्लेनची कत्तल, स्त्री बालकांसह ६४२ व्यक्तींची हत्या.

    १९७७ : अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा अ‍ॅपल-II हा संगणक बाजारात आला.

    १९८२ : पासून दृष्टीदिन महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.

    १९९९ : उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती साठी निवड झाली.

    २००३ : स्पिरिटरोव्हर मंगळाकडे रवाना.