११ जून दिनविशेष ; सुखोई-३०के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल. ; जाणून घ्या आजच्या दिवसाची वैशिष्ट्ये!

    घटना.

    १६६५ : मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.

    १८६६ : अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.

    १८९५ : पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली.

    १९०१ : न्यूझीलंडने कूक बेटे बळकावली.

    १९०७ : नॉर्धनम्प्टनशायर क्रिकेट संघ १२ धावांत सर्वबाद.

    १९३५ : एडविन आर्मस्ट्राँग यांनी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.

    १९३७ : जोसेफ स्टालिनने आपल्याच ८ लष्करी अधिकार्‍यांना ठार केले.

    १९७० : अ‍ॅनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.

    १९७२ : दारू पिउन रेल्वे चालवल्यामुळे एल्थाम वेल हॉल येथे रेल्वे अपघात होऊन ६ जण ठार व १२६ जण जखमी झाले.

    १९९७ : सुखोई-३०के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.

    १९९८ : कॉम्पॅक कॉम्पुटर कंपनी ने डिजिटल एक़्पिमेंट कॉर्पोरेशन विकत घेण्यासाठी ९ अब्ज अमेरिकी डॉलर मध्ये इतिहासातील सर्वात मोठा सौदा केला.

    २००४ : कॅसिनी-हायगेन्स अंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.

    २००७ : बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.