१२ जून दिनविशेष; भारतीय पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.;  जाणून घ्या आजच्या दिवसाची वैशिष्ट्ये!

  घटना.

  १८९८ : फिलिपाइन्सने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

  १९०५ : गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.

  १९१३ : जॉन ब्रे या अमेरिकन माणसाची जगातील पहिली कार्टून फिल्म.

  १९४० : दुसरे महायुद्ध – १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.

  १९४२ : अॅन फ्रॅंक यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.

  १९४४ : दुसरे महायुद्ध –जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.

  १९६४ : वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

  १९७५ : अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.

  १९९३ : पृथ्वी क्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.

  १९९६ : भारतीय पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.

  २००१ : कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे.