९ जून दिनविशेष; भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी सूत्रे हाती घेतली

  ६८: रोमन सम्राट नीरो याने आत्महत्या केली.

  १६६५: मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.

  १६९६: छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडुतील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्‍न झाले. मुलाचे नाव शिवाजी असे ठेवले.

  १७००: दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.

  १८६६: अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.

  १९००: भारतीय राष्ट्रवादी बिरसा मुंडा यांचे ब्रिटिशांच्या तुरुंगात निधन झाले.

  १९०६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लंडनला प्रयाण.

  १९०७: नॉर्धनम्प्टनशायर क्रिकेट संघ १२ धावांत सर्वबाद.

  १९२३: बल्गेरियात लष्करी उठाव झाला.

  १९३१: रॉबर्ट गोडार्ड या शास्त्रज्ञाला अंतराळ प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणार्‍या रॉकेटचे पेटंट मिळाले.

  १९३४: डोनाल्ड डक पहिल्यांदा द व्हाइज लिटिल मर्नमध्ये दिसले.

  १९३५: एडविन आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.

  १९४६: राजे भूमिबोल अतुल्यतेज थायलंडच्या राजसिंहासनावर विराजमान झाले. कोणत्याही देशावर सर्वात दीर्घकाळ राज्य करणारे हे राजे आहेत.

  १९६४: भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी सूत्रे हाती घेतली.

  १९७०: अ‍ॅनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.

  १९७४: सोविएत रशिया आणि पोर्तुगाल यांच्यात राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले.

  १९७५: ब्रिटनमधील लोकसभेच्या (House of Commons) कामकाजाचे दूरचित्रवाणीवरुन थेट प्रसारण सुरू झाले.

  १९९७: सुखोई-३० के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.

  २००१: भारताच्या लिअँडर पेस व महेश भूपतीने फ्रेन्च टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवले.

  २००४: कॅसिनी-हायगेन्सअंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.

  २००६: १८ वी फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू झाली.

  २००७: बांगलादेशातील  चितगावमध्ये भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.