nitish kumar- upcoming election

उंट कुण्या कडेवर बसणार हे ते अचूक जाणतात. त्यामुळे त्यांचा पक्ष व त्यांचे राजकारण जिधर दम उधर हम स्टाईलने होत असते. ते तत्वाचे राजकारण मुळीच करीत नाही. त्यांना तत्त्व, नैतिकता वगैरे फारशी ज्ञात नाही.

राजकारणाचे वारे कुणीकडे वाहणार हे अचूक जाणण्याचे कौशल्य लोजपा नेते रामविलास पासवान यांच्यात आहे. उंट कुण्या कडेवर बसणार हे ते अचूक जाणतात. त्यामुळे त्यांचा पक्ष व त्यांचे राजकारण जिधर दम उधर हम स्टाईलने होत असते. ते तत्वाचे राजकारण मुळीच करीत नाही. त्यांना तत्त्व, नैतिकता वगैरे फारशी ज्ञात नाही. सत्तेत काय मिळते पाहून ते आपली भूमिका ठरवित असतात. रामविलास यांच्या दोन पावले पुढे त्यांचे चिरंजीव चिराग आहेत. ते लोजप अध्यक्ष स्वरुपात नितीशकुमार यांचे कट्टर विरोधक व निंदक आहेत. भाजपला नितीश व पासवान हे दोघेही आपल्या समवेत असावेत असे वाटते. पण राज्यस्तरावर पासवान-नितीश यांच्यातून विस्तव जात नसल्यामुळे भाजपची अडचण वाढली आहे. नोव्हेंबरमध्ये बिहारात विधानसभा निवडणूकीचे बिगूल वाजणार आहे. नितीशकुमार यांची जदयू व भाजप युतीचा सामना लालुप्रसादांचा राजद व पासवान यांच्या लोजपा सोबत होणार आहे.

अस्तित्व टिकविण्यासाठी पासवान यांची दबावनीती

लोक जनशक्ती पक्षाने जदयूच्या विरोधात १४६ विधानसभेच्या जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. लोजपाचे नितीश यांचे नेतृत्व नाकारणे म्हणजे आपले अस्तित्व टिकविण्याचे प्रयत्न स्वरुपात पाहिल्या जात आहे. पासवान यांच्या मते नितीशांचे मागासवर्गीयांमध्ये स्थान मजबूत होणे लोजपासाटी संकटाची घंटी आहे. आपले अस्तित्त्वच संकटात येईल असे पासवान पिता-पुत्राला वाटत आहे. चिराग पासवान हे कशा प्रकारचे राजकारण करु पाहतात? भाजप सोबत मित्रता व नितीशांसोबत दुश्मनी? काहीही झाले तर भाजप नितीशांसोबतचे गठबंधन तोडणार नाही. चिराग यांच्या पत्राने जदयूचे नेते संतप्त झाले आहेत. जदयू म्हणाले की, आमचे गठबंधन भाजपसोबत आहे. लोजपासोबत नाही. लोजपाला जर भाजप-जदयू गठबंधनात सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर लोजपा थेट एकला चलो रे ची भूमिका ठेवू शकते. नितीश यांच्या नेतृत्वात लोजप निवडणूक लढविणार नाही.

नितीशांच्या अडचणी कमी नाहीत

यावेळी नितीशकुमार यांना कठीण स्थितीतून जावे लागेल. निवडणुकीत अनेक मुद्यांना त्यांना सामोरे जावे लागेल. कोरोना, महापुराने जे नुकसान झाले ते पाहता जनतेला यात फारसा दिलासा मिळाला नाही. मागास व अतिमागास समाज जदयूपासून तसाही दूर गेला आहे. यात त्यांनी निवडणूकीचे बिगुल फुंकले आहे. व्हर्च्युअल रॅलीत बोलताना ते म्हणाले की, राज्यात सरप्लस वीज आल्यामुळे लालटेन लावण्याचे कारण नाही. लालूप्रसाद व राबडीदेवींना त्यांनी जबरदस्त टार्गेट केले आहे. लालू यादव यांच्यावर प्रखर टीका करताना ते म्हणाले की, लोक अंदर आहेत पण त्यांनी बाहेर एक माणूस ठेवला तो दिवसभर बकवास करीत असतो. लालू राजवटीत स्थिती फार गंभीर होती. कायदा व सुव्यवस्था संपण्यात जमा झाली होती. लोकं गाडीतून रायफल दाखवित फिरत होते. नितीशांनी दावा केला की १० लाख लोकांना केंद्र व राज्याच्या योजनांमधून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपात रोजगार मिळाला आहे. घराघरांत पिण्याचे पाणी पोहोचले आहे. सरकार स्टुडंट क्रेडिट कार्ड योजनेत हुशार विद्यार्थ्यांचे कर्ज व्याज माफ करणार आहे. राज्यात दररोज १.५ लाख लोकांची कोरोना टेस्ट होत आहे. रुग्णालयात पर्याप्त बेड व व्हेंटिलेटर आहेत.

मांझी काय करणार?

यावेळी लालूंच्या राजदची स्थिती बरोबर नाही. अति मागास लोकांचे नेतृत्व करणारे जीवनराम मांझी सलग लालूंवर जबरदस्त टीक करत आहेत. मांझीचा पक्ष राजदचे मतदार विभाजित करेल. लालूंचे पुत्र फार मोठे नेते नाहीत व ते सत्ता सांभाळण्यात सक्षमही नाहीत.