shivram rajguru

राजगुरू (Rajguru Birthday Special)यांचा जन्म पुणे(Pune) जिल्ह्यातील खेड गावात झाला. काशीमध्ये संस्कृत व धर्मशास्त्राचे शिक्षण घेत असताना राजगुरू क्रांतिकारकांच्या संपर्कात आले. त्यानंतर १९२४ ला काही दिवसांमध्ये त्यांना ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टी’चे सदस्यत्व मिळाले.

    भारताला(India) स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी बलिदान दिले. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये मृत्यूला हसत हसत सामोरे जाणाऱ्या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांचे नाव आदराने घेतले जाते. या तिघांपैकी शिवराम हरी राजगुरू(Shivram Rajguru) यांचा २४ ऑगस्ट १९०८ हा जन्मदिन.

    राजगुरू (Rajguru Birthday Special)यांचा जन्म पुणे(Pune) जिल्ह्यातील खेड गावात झाला. काशीमध्ये संस्कृत व धर्मशास्त्राचे शिक्षण घेत असताना राजगुरू क्रांतिकारकांच्या संपर्कात आले. त्यानंतर १९२४ ला काही दिवसांमध्ये त्यांना ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टी’चे सदस्यत्व मिळाले. या संघटनेत भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, यतींद्रनाथ दास या सारखे क्रांतिकारी देशभक्त युवक सामील होते. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, यतीनदास यांच्यासोबत राजगुरु यांनी पंजाब, कानपूर, आग्रा व लाहोरामध्ये ब्रिटिशाविरुद्ध असंतोष निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

    सायमन कमिशनविरुद्ध १९२८ मध्ये निदर्शने करण्यात आली. या निदर्शनामध्ये ब्रिटिशांनी केलेल्या लाठीहल्ल्यात लाला लजपतराय जखमी झाले होते. पुढे १७ नोव्हेंबर १९२८ ला लाला लजपतराय यांचे निधन झाले. क्रांतिकारकांनी त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मोहीम आखली. या मोहीमेमध्ये भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांच्यावर सगळी जबाबदारी सोपवण्यात आली.

    लाला लजपत राय यांच्यावर लाठीमार करणारा उपपोलीस अधीक्षक सॅन्डर्स याला मारण्याची योजना आखण्यात आली. ठरल्याप्रमाणे १७ डिसेंबर १९२८ ला सॅन्डर्स लाहोरमधील कार्यालयाच्या बाहेर निघाला असता राजगुरूने त्यांच्यावर गोळी झाडली. यानंतर २० डिसेंबरला भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु भूमिगत झाले. राजगुरू ३० डिसेंबर १९२९ ला पुण्यात पकडले गेले. लाहोर कटातील सहभागाबद्दल अनेक जणांवर खटला चालला. त्यापैकी भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांना  २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली. असे सांगितले जाते की मृत्यूच्या आधी तिघेही जण आनंदाने गाणे गात होते. राजगुरु यांच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कार फिरोजपुर जिल्ह्यात सतलज नदीच्या काठावर करण्यात आले.