दिनविशेष : ०४ जून २०२१; इन्सॅट-२डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले. ; वाचा, आजच्या दिवसातील इतिहासातल्या घडामोडी!

  घटना.

  १६७४ : राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे ७३ किलो भरले.

  १८७६ : ट्रान्सकाँटिनेन्टल एक्स्प्रेस रेल्वे अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी खेप होती.

  १८७८ : ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंग्डमच्या हवाली केले.

  १८९६ : हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण.

  १९४४ : दुसरे महायुद्ध – दोस्त सैन्याने रोम जिंकले.

  १९७० : टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

  १९७९ : घानामधे लष्करी उठाव.

  १९९३ : आय.एन. एस. म्हैसूर या युद्धविनाशिकेचे जलावतरण.

  १९९४ : वेस्टइंडिजच्या ब्रायन लाराचा ८ डावांत ७ शतकांचा नवा विक्रम.

  १९९४ : गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

  १९९७ : इन्सॅट-२डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.

  २००१ : नेपाळचा शेवटचा राजा ग्यानेंद्र राज्यपदावर.