०५ सप्टेंबर : इतिहासात आजचा दिवस; रोममधील ऑलिम्पिक खेळांमध्ये १९६० साली ‘लाईट हेवीवेट’ बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद अली यांनी सुवर्ण पदक जिंकले.

  घटना.

  १९३२ : बर्किना फासोच्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट, माली व नायजर या राष्ट्रांत विभाजन.

  १९४१ : इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.

  १९६० : रोम मधील ऑलिम्पिक खेळांमध्ये लाईट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद अली यांनी सुवर्ण पदक जिंकले.

  १९६१ : अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू.

  १९६७ : ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे ७वे कुलगुरू झाले.

  १९७० : इटालियन ग्रांप्रीच्या प्रॅक्टिसमध्ये मारल्याच्या घटनेनंतर मरणोत्तर फॉर्मूला वन वर्ल्ड ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकणारे जोकेन रांड हे एकमेव ड्रायव्हर ठरले.

  १९७२ : ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी म्युनिक ऑलिंपिकमधील इस्राएलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले.

  १९७५ : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्डवर असफल खुनी हल्ला.

  १९७७ : व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.

  १९८४ : एस. टी. एस. ४१-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.

  २००० : ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

  २००५ : इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे फ्लाईट ०९१ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळून विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.