०६ सप्टेंबर : इतिहासात आजचा दिवस; पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची १९६५ साली सुरुवात झाली.

    घटना.

    १५२२: फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.

    १८८८: चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात २५० क्रिकेट बळीचा विक्रम.

    १९३९: दुसरे महायुद्ध–दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

    १९५२: कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र माँट्रिअल येथे सुरू झाले.

    १९६५: पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली.

    १९६६: दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.

    १९६८: स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.

    १९९३: ज्येष्ठ कवी विं. दा. करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड.

    १९९७: अमेरिकेच्या नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस संस्थेची सरोदवादक अमजद अली खाँ यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली.