०७ सप्टेंबर : इतिहासात आजचा दिवस; भारतात १९०६ साली ‘बँक ऑफ इंडिया’ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.

  घटना.

  १६७९ : सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.

  १८१४ : दुसर्‍या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने उंदेरी-खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.

  १८२२ : ब्राझिलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.

  १९०६ : बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.

  १९२३ : इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.

  १९३१ : दुसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

  १९५३ : निकिता ख्रुश्चेव सोविएत संघाच्या सर्वेसर्वापदी.

  १९७८ : मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.

  १९७९ : दिवाळखोरी टाळण्यासाठी ख्रायसलर कॉर्पोरेशन ने अमेरिकन सरकारकडे १.५ बिलियन डॉलर्सची मागणी केली.

  २००५ : इजिप्तमधे पहिल्यांदाच बहुपक्षीय सार्वत्रिक निवडणुका.