९ सप्टेंबर, इतिहासात आजचा दिवस; मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने १९८५ साली तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार केली.

    घटना.

    १५४३ : नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली.

    १७९१ : वॉशिंग्टन डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले.

    १८३९ : जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले.

    १८५० : कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१वे राज्य बनले.

    १९३९ : प्रभात कंपनीचा ‘माणूस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

    १९४५ : दुसरे चीन जपान युद्ध, जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.

    १९८५ : मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.

    १९९० : श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.

    १९९१ : ताजिकिस्तान देश सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

    १९९७ : ७ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब मिळाला.

    २००१ : व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.

    २००९ : ठीक ९ वाजुन ९ मिनिटे व ९ सेकंदांनी दुबई मेट्रोचे उद्‍घाटन झाले.

    २०१२ : भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या ‘२१-पीएसएलव्ही’चे प्रक्षेपण केले.

    २०१५ : एलिझाबेथ (दुसरी) युनायटेड किंग्डम वर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली.

    २०१६ : उत्तर कोरियाने पाचवी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली आहे.