१० ऑक्टोबर : इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी १८४६ साली नेपच्यून ग्रहाचा सर्वांत मोठा चंद्र ‘ट्रायटन’चा शोध लावला.

    घटना.

    १८४६ : इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन चा शोध लावला.

    १९११ : चीनमध्ये किंग वंशाचा शेवट.

    १९१३ : पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले.

    १९४२ : सोव्हिएत युनियनचे ऑस्ट्रेलिया बरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

    १९४४ : दुसरे महायुद्ध – ८०० जिप्सी बालकांना छळ छावणीत ठार केले.

    १९५४ : ‘श्यामची आई’ या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले.

    १९६० : विद्याधर गोखले यांच्या ’सुवर्णतुला’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

    १९६४ : जपानमधील टोकियो येथे १८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

    १९७० : फिजीला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.

    १९७५ : पापुआ न्यू गिनी चा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश केला.

    १९९८ : आदर्श सेन आनंद भारताचे २९ वे सरन्यायाधीश.