१० सप्टेंबर इतिहासात आजचा दिवस; १९६६ साली पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.

    घटना.

    १८४६ : एलियास होवेयाला यांना अमेरिकेत शिवण मशीनचे पेटंट मिळाले.

    १८९८ : लुइगी लुकेनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली.

    १९३६ : प्रथम जागतिक वैयक्तिक मोटरसायकल स्पीडवे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली.

    १९३९ : दुसरे महायुद्ध – कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

    १९४३ : दुसरे महायुद्ध– जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

    १९६६ : पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.

    १९६७ : जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.

    १९७५ : व्हायकिंग-२ हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.

    १९९६ : गोमंतक मराठी अकादमीचा पहिला कृष्णदास शामा पुरस्कार बा. द. सातोस्कर यांना, तर पंडित महादेवशास्त्री जोशी साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर झाला.

    २००१ : मार्क इन्ग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करुन इंग्लंडमधील कौन बनेगा करोडपती (Who wants to be a millionaire) ही स्पर्धा जिंकली.

    २००२ : परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला.