११ सप्टेंबर; इतिहासात आजचा दिवस : महात्मा गांधींनी १९०६ साली दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.

  घटना.

  १२९७: स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव.

  १७७३: बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला.

  १७९२: होप हिरा चोरला गेला.

  १८९३: स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.

  १९०६: महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.

  १९१९: अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.

  १९४१: अमेरिकेने पेंटागॉन बांधायला सुरुवात केली.

  १९४२: आझाद हिंद सेनेने जन गण मन राष्ट्रगीत म्हणून गायले.

  १९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार.

  १९६१: विश्व प्रकृती निधी (World Wildlife Fund) ची स्थापना.

  १९६५: भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.

  १९७२: नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला.

  १९९७: नासाचे मार्सग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोहोचले.

  २००१: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.

  २००७: रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.