१२ सप्टेंबर; इतिहासात आजचा दिवस : ‘मेटसॅट’ या भारताच्या उपग्रहाचे २००२ साली यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

  घटना.

  १६६६: आग्ऱ्याहून सुटका : शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले.

  १८५७: कॅलिफोर्निया ‘गोल्ड रश’मध्ये सापडलेले १३-१५ टन सोने घेऊन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने व ४२६ प्रवाशांसह बुडाले.

  १८९७: तिरह मोहिम: सारगढीची लढाई.

  १९१९: अॅडॉल्फ हिटलर यांनी जर्मन वर्कर्स पार्टीमध्ये प्रवेश केला.

  १९३०: विल्फ्रेड र्‍होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे १११० वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.

  १९४८: भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. हैदराबाद मुक्तिसंग्रामास पोलिस अॅक्शन असे म्हटले जाते.

  १९५९: ल्युना-२ हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले.

  १९८०: तुर्कस्तानमध्ये लष्करी उठाव.

  १९९८: डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.

  २००२: मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.

  २००५: हाँगकाँगमधील डिस्नेलँड सुरू झाले.

  २०११: न्यूयॉर्क शहरातील ९/११ मधील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु झाले.