१३ सप्टेंबर; इतिहासात आजचा दिवस : २००८ साली दिल्लीतील बॉम्बस्फोटांत ३० ठार, १३० जण जखमी झाले.

  घटना.

  १८९८ : हॅनीबल गुडविन यांनी सेल्यूलॉइड फोटोग्राफिक फिल्म चे पेटंट घेतले.

  १९२२ : लिबियातील अझिजिया येथे ५७.२° सेल्सियस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.

  १९४८ : ऑपरेशन पोलो – विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.

  १९८५ : सुपर मारियो गेम जपानमध्ये प्रकाशित झाला.

  १९८९ : आर्च बिशप डेस्मंड टुटू यांनी वर्णद्वेषी धोरणाला विरोध करण्यासाठी दक्षिण अाफ्रिकेत विशाल मोर्चा काढला.

  १९९६ : श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती इंदुमती पारिख यांना दिला.

  २००३ : ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.

  २००३ : मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.

  २००८ : दिल्लीतील बॉम्बस्फोटांत ३० ठार, १३० जण जखमी झाले.