१४ ऑक्टोबर : १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ३ लाख ८० हजार अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला.

  घटना.

  १८८२ : भारतात (सध्याच्या पश्चिम पाकिस्तान) पंजाब विद्यापीठ सुरु झाले.

  १९१२ : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थियोडोर रुझवेल्ट यांच्यावर जॉन श्रॅन्क या वेडसर व्यक्तीने खुनी हल्ला केला.

  १९२० : ऑक्सफर्ड विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमास स्त्रियांना प्रवेश दिला.

  १०२६ : ए. ए. मिल्ने यांचे विनी-द-पूह हे लहान मुलांसाठी पुस्तक प्रकाशित झाले.

  १९४७ : चार्ल यॅगर या वैमानिकाने X-१ या विमानातून ध्वनीपेक्षा जास्त वेगाने पहिले यशस्वी उड्डाण केले.

  १९५६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला.

  १९८१ : उपराष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड.

  १९८२ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारले.

  १९९८ : विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर.