१४ सप्टेंबर; इतिहासात आजचा दिवस : हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून १९४९ साली ‘हिंदी दिन’ साजरा करण्यात आला.

  घटना.

  ७८६: हरुन अल रशिद बगदादचा खलिफा झाला.

  १८९३: सरदार खाजवीवाले, गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले.

  १९१७: रशियाने स्वत:ला प्रजासत्ताक घोषित केले.

  १९४८: दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला.

  १९४९: हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.

  १९५९: सोव्हिएत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोहोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती.

  १९६०: ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज (OPEC) ची स्थापना झाली.

  १९७८: व्हेनेरा-२ हे रशियाचे अंतराळयान शुक्राकडे झेपावले.

  १९९५: संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

  १९९७: बिलासपूर अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस रेल्वे दुर्घटनेत ८१ जण ठार झाले.

  १९९९: किरिबाटी, नौरू व टोंगा या राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.

  २०००: मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोज एमई रिलीज केले.

  २००३: इस्टोनियाच्या जनतेने जनमत चाचणीत युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.