१८ ऑगस्ट, २०२१ : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे १९४२ साली तिरंगा फडकावला.; जाणून घ्या इतिहासातल्या आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य!

  घटना.

  १८४१ : जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली.

  १९२० : अमेरिकेच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार.

  १९४२ : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकावला.

  १९४५ : इंडोनेशियाच्या पहिल्या अध्यक्ष पदावर सुकारणो हे कार्यरत झाले.

  १९५८ : बांग्लादेशचे ब्रोजन दास इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई ठरले.

  १९६३ : जेम्स मेरेडिथ हा मिसिसिपी विद्यापीठातून स्नातक होणारा पहिला श्यामवर्णीय व्यक्ती झाला.

  १९९९ : गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या वा पोलिस कोठडीतल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई.

  २००५ : जावा बेटावर वीज गेल्यामुळे १० कोटी लोक अंधारात.

  २००८ : हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.