१९ ऑगस्ट, २०२१ : गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला १८५६ साली दुधाच्या शितकरण प्रक्रियेचे पेटंट मिळाले ; जाणून घ्या इतिहासातल्या आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य!

  घटना.

  २९५ ख्रिस्त पूर्व: प्रेम, सौंदर्य आणि प्रजनन यांची रोमन देवी व्हीनसचे पहिले मंदिर पूर्ण झाले.

  १८५६: गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट.

  १९०९: इंडियानापॉलिस मोटर स्पीडवे येथे मोटारींची पहिली शर्यत.

  १९१९: अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.

  १९४५: होची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.

  १९९१: सोविएत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुटीवर असताना नजरकैदेत घातले गेले.

  १९९९: बेल ग्रेड, युगोस्लाव्हियात हजारो सर्बियन लोकांचे राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन.