२० ऑगस्ट, २०२१ : पहिल्या महायुद्धात जर्मन फौजांनी ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.; जाणून घ्या, इतिहासातल्या आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य!

  घटना.

  १६६६ : शिवाजीराजांनी दख्खनेमधे येण्यासाठी नरवीर घाटी हे ठाणे खोटे दस्तऐवज दाखवून ओलांडले.

  १८२८ : राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.

  १८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.

  १९१४ : पहिले महायुद्ध –जर्मन फौजांनी ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.

  १९२० : डेट्रॉइट,मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद्र 8MK (सध्याचे WWJ) सुरू झाले.

  १९४१ : दुसरे महायुद्ध – फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली

  १९६० : सेनेगलने आपण मालीपासून स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.

  १९८८ : ८ वर्षांच्या युद्धानंतर इराण-इराक युद्धबंदी करार झाला.

  १९९५ : भारतातील फिरोजाबाद रेल्वे अपघातात २५८ जणांचा मृत्यू झाला.

  २००८ : कुस्तीगीर सुशील कुमारला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.