२१ ऑगस्ट, २०२१ : मंगळाच्या शोधमोहिमेतील मार्स ऑब्झर्व्हर या यानाचा १९९३ साली याच दिवशी पृथ्वीशी असलेला संपर्क तुटला. ; जाणून घ्या, इतिहासातल्या आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य!

    घटना :

    १८८८ : विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले.

    १९११ : पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातून ‘लिओनार्डो-द-व्हिन्सी’ याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.

    १९९१ : लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.

    १९९३ : मंगळाच्या शोधमोहिमेतील मार्स ऑब्झर्व्हर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला.

    जन्म :

    १७६५ : इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचा जन्म. (मृत्यू: २० जून १८३७)

    १८७१ : भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३५)

    १७८९ : फ्रेन्च गणितज्ञ ऑगस्टिन कॉशी यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १८५७)

    १९०५ : भारतीय अभिनेते आणि निर्माते बिपीन गुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९८१)

    १९०७ : भारतीय वकील आणि राजकारणी पी. जीवनवंश यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९६५)

    १९०९ : कवी नागोराव घन:श्याम तथा ना. घ. देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १० मे २०००)

    १९१० : जगप्रसिद्ध चित्रकार नारायण बेन्द्रे यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९२)