२२ ऑगस्ट, २०२१ : ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास (आताचे चेन्नई) शहरात १६३९ साली व्यापाराची सुरुवात केली.; जाणून घ्या, इतिहासातल्या आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य!

  घटना.

  १६३९ : ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास (आताचे चेन्नई) शहरात व्यापाराची सुरुवात केली.

  १८४८: अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.

  १९०२: कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना.

  १९०२: मोटार वाहनामध्ये फिरणारे थिओडोर रूझवेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते.

  १९४१: दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला.

  १९४२: दुसरे महायुद्ध – ब्राझीलने जर्मनी इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.

  १९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.

  १९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.

  १९७२: वर्णद्वेषी धोरणाबद्दल झिम्बाब्वेची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतून  हकालपट्टी करण्यात आली.