२३ ऑगस्ट, २०२१ : हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने १९९७ साली जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.; जाणून घ्या, इतिहासातल्या आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य!

    घटना.

    १८३९ : युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.

    १९१४ : पहिले महायुद्ध – जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

    १९४२ : मो. ग. रांगणेकर यांच्या कुलवधू नाटकाचा पहिला प्रयोग.

    १९४२ : दुसरे महायुद्ध – स्टालिन ग्राडची लढाई सुरू.

    १९६६ : लुनार ऑर्बिटर-१ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.

    १९९० : आर्मेनिया सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

    १९९१ : ‘वर्ल्ड वाईड वेब’ सार्वजनिक उपयोगासाठी सुरु झाले.

    १९९७ : हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.

    २००५ : कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.

    २०११ : लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता संपुष्टात.

    २०१२ : राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार.