२४ सप्टेंबर : १९३२ साली झालेल्या पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, बॅरिस्टर मुकुंदराव जयकर आदींनी स्वाक्षऱ्या केल्या.

    घटना.

    १६६४ : नेदरलँड्सने न्यू ऍम्स्टरडॅम इंग्लंडच्या हवाली केले.

    १८७३ : महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

    १९३२ : पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या.

    १९४६ : हाँगकाँग येथे कॅथे पॅसिफिक एअरवेज ची स्थापना झाली.

    १९४८ : होंडा मोटार कंपनीची स्थापना.

    १९६० : अणुशक्तीवर चालणाऱ्या यू. एस. एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.

    १९७३ : गिनी-बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.

    १९९४ : सॅटॅनिक व्हर्सेस या कादंबरीचे वादग्रस्त लेखक डॉ. सलमान रश्दी यांच्यावरील मृत्युदंडाचा फतवा मागे.

    १९९५ : मृत्यूंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.

    १९९९ : कैगा अणूशक्ती प्रकल्पाचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.

    २००७ : कर्णधार धोनीच्या नेतृवाखाली भारताने टी-२० विश्वकप जिंकला.

    २०१४ : मार्स ऑर्बिटरी मिशन (एमओएम) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इसरो) प्रक्षेपण केलेल्या मार्स ऑर्बिटर ने मार्स ची कक्षा ओलांडली.

    २०१५ : मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरीत ७१७ लोक ठार.